Thursday, October 4, 2018

शंभुराजेंसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या म्हाळोजींची शौर्यगाथा.

इतिहासातील एक अपरिचित योध्दा म्हाळोजी बाबा

मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली...आणि बघता बघता पाचशे मावळा सज्ज झाला, गनिमांच्या डोळ्यात डोळा टाकुन बघत होता...अफाट अफाट सेनासागर आणि टिचभर पाचशे मावळा राजांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत ! बघता बघता मुकर्रब हाजीर झाला.आणि कडाडला एल्गार !!! हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या...झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली...अरे काळोख थरारला....रात्र थरारली....अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला,शौर्याची लाट उसळली...अवघं तुफान तुफान झालं...अरे एकेक मावळा झुंजत होता...शर्थीनं लढत होता....बस्स्स....मोगलांची कापाकापी करत होता...शिवाजी महाराज सांगायचे...माझा एक मावळा शंभराला भारी आहे! ईथं एक मावळा पाचशे ला भारी पडत होता, मोगलांना बस्स्स कापत होता !! मुकर्रब बघत होता...

पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. ईथला एकेक मावळा लढत होता राजासाठी. स्वत: साठ वर्षाचा म्हाळोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय...जो समोर येईल त्याला सरळ कापतोय...रक्ताच्या चिरकांड्या,मांसांचे लगदे...अरे खच प्रेतांचा...आणि फिरतोय म्हाळोजी !! मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि म्हणाला, इस बुढे को पहले लगाम डालो...! तसं सगळं यवनी सैन्य म्हाळोजीबाबाच्या भोवती जमा झालं..अभिमन्यु चक्रव्ह्युवात अडकावा तसा म्हाळोजी अडकला...दोन्ही हातात समशेरी...सगळ्या मोगली सेनेचे एकाच वेळी वार झाले..दोन्ही तलवारींवर पेलले,म्हाळोजी खाली बसला,साठ वर्षांचं रद्दाड शरीर, विज लखलखली...आणि रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. 

अरे तो जोश वेगळा..तो आवेश वेगळा...अरे ते शौर्य बघितलं, आणि मुकर्रबला कळालं, वाघ कसा असतो !! अफाट अफाट अफाट शौर्य ! पण त्याच वेळी मुकर्रबखानानं चाल खेळली,कमानमाराला बोलवलं...आणि तिस-या बाजुकडुन म्हाळोजीवर नेम धरला...तीर सुटला..उजव्या दंडात घुसला...समशेर खाली पडली..दुसरा तीर कंठात...दोन्ही समशेरी खाली पडल्या...नि:शस्त्र झाला म्हाळोजी...गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्यात...असं मोगली सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं...शरीरावर अशी एक जागा शिल्लक राहली नाही...

जिथं वार झाला नाही...रक्ताळलेला म्हाळोजीबाबा मातीत पडला...!! अखेरचा श्वास फुलला...डोळे लवले, ओठ हलले.त्या श्वासानं माती ऊंच उडाली...आणि त्या ऊंच उडालेला मातीला म्हाळोजी सांगता झाला...सांगा माझ्या राजाला...हा म्हाळोजी गेला..मातीत मेला...पण नुसता मातीत नाही मेला...मातीसाठी मेला..अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला.

हि महान्यूज आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

मंदिराच्या सुरवातीला कासव का असते जाणुन घ्या

आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर तिथे सर्वात पुढे आपल्याला कासव असल्याचे दिसते !

मंदिरात कासव का असते ? जाणून घ्या...

🐢कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.
🐢कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. 🐢कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.
🐢 कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.
🐢 काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.
🐢आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

🐢 *कासवाचे गुण* 🐢
🐢1)कासवाला ६ अंग (४ पाय १ तोंड १ शेपूट =६  ) असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात
काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर
🐢कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे
🐢2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.
🐢3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा
यांकरीता कासव मंदिरात असते.
🐢४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.
🐢*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*
🐢कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

गीता कुराण बायबल पेक्षा आम्हाला संविधान प्रिय : मुख्यमंत्री

गीता बायबल आणि कुरणापेक्षा आम्हाला संविधान जास्त प्रिय असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त ते ठाण्यात बोलत होते.

इंदु मिलमध्ये होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडली तर हे राज्य गहाण ठेवीन अस बोलत त्यांनी उपस्थित भीम बांधवांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

संविधान आहे म्हणुन आम्ही आहोत,या संविधानामुळेच आमचे अस्तित्व असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा अफवा असुन स्मारकाच्या आराखड्यात कोणताही बदल करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले.

Wednesday, October 3, 2018

सचिन व द्रविड पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मराठीत का बोलायचे

सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड कोणत्याही देशाविरुद्ध सामना असल्यावर हिंदीत बोलायचे पण पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात हिंदीतून न बोलता मराठीत बोलायचे.

सर्वांनाच प्रश्न पडला असेल की ते पाक विरुद्ध मराठीत का बोलायचे  तर याचे कारण असे आहे की ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड ह्या देशातील खेळाडुंना फक्त इंग्रजी समजते हिंदी समजत नाही परंतु पाकिस्तान च्या प्रत्येक खेळाडु ला हिंदी येत असल्या कारणाने टीमची स्ट्रॅटेजी पाक ला कळु नये म्हणुन सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड चर्चा करताना मराठीत करायचे.
राहुल द्रविड कर्नाटकचा असला तरी त्याला उत्तम मराठी जमते.